मनोगत
इकोलॉजिकल सोसायटी, पुणे, आणि आजचा सुधारक, ह्यांनी एकत्रितपणे साकारलेला शाश्वत भविष्याविषयीचा विशेषांक जुलै महिन्यात प्रकाशित झाला. त्यावेळी मनोगतात म्हटल्याप्रमाणे भविष्याच्या शाश्वततेविषयी सर्व प्रश्नांची उत्तरे त्यातून देण्याचा दावा नाही. उलट, त्याविषयी अधिक व्यापक आणि सखोल संवाद सुरू करण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यातील लेख घोषणांपलीकडे जाऊन, आपल्या जीवनशैलीचा, विकासाच्या संकल्पनांचा, आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा पुनर्विचार करण्याची …